महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच आपलं शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. त्यांनी आपला मुक्काम ‘मातोश्री’वर हलवला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या सगळ्या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”, असे कॅप्शन दिले आहे. स्वराने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

आणखी वाचा : “अभद्र युत्या, पक्षनिष्ठा…”; महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. स्वराही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच स्वरा भारतात आणि विदेशात होणाऱ्या घडामोडींवर तिची प्रतिक्रिया देत असते.

Story img Loader