बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच तिच्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा एखाद्या सामाजिक विषयावर किंवा घटनेवर मत मांडल्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र ती देखील शांत बसत नाही. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच स्वराने एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि बॉलिवूड निर्माता करण जोहरबद्दल भाष्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू होऊन दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी त्याचे चाहते अद्याप त्याला विसरु शकलेले नाही. सुशांतचे तिची आठवण काढताना दिसत आहे. त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते सुशांतच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच त्याच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जातात. स्वरा भास्करने नुकतंच एफएम कनाडाला दिलेल्या मुलाखतीत सिनेसृष्टीतील अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
आणखी वाचा : बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सुरु आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर अनेक नेटकरी हे घराणेशाही आणि सिनेसृष्टीतील कलाकार यावरुन सोशल मीडियावर विविध हॅशटॅग ट्रेंड करत असतात. यात अनेकदा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचे नाव अनेकदा घेतले जाते. नुकतंच या मुद्द्यावर अभिनेत्री स्वरा भास्करने उघडपणे भाष्य केले आहे. यावेळी स्वराने करण जोहरला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला आहे.

यावेळी स्वरा म्हणाली, “सध्या सिनेसृष्टीत दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही वादात पडण्यापूर्वी विचार करावा लागतो. जर सिनेसृष्टीत कोणताही वाद असेल तर त्यावर नाराज न होणे किंवा त्यावर काहीही भाष्य न करणे हा सध्या सर्वोत्तम मार्ग आहे.”

आणखी वाचा : “हिंदू म्हणून मला अशा लोकांची लाज वाटते जे…”; स्वरा भास्कर संतापली

“सध्या अनेकजण घराणेशाहीवर टीका करताना त्याला लक्ष्य करताना दिसत आहेत. पण जर तुम्हाला त्यांचे चित्रपट आवडत नसतील तर तुम्ही ते बघू नका. जर तुम्हाला करण जोहर आवडत नसेल तर तुम्ही ते स्पष्टपणे बोलू शकता. त्यांचे चित्रपट तुम्हाला आवडत नसतील तरीही तुम्ही तुमचे मत मांडू शकता. तो बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा देतो, असेही तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकता. पण याचा अर्थ करण जोहर खूनी आहे असा होत नाही, असेही स्वराने म्हटले.”

दरम्यान स्वरा भास्कर ही नुकतीच ‘जहां चार यार’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत पूजा चोप्रा, मेहर विज आणि शिखा तलसानिया हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकले होते.

Story img Loader