अभिनेत्री स्वरा भास्कर आणि चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं यापूर्वी अनेकदा ट्विटवर शाब्दिक युद्ध झालंय. अनेकदा त्यांच्या या बाचबाचीच्या बातम्याही झाल्यात. अगदी विरोधी भूमिकांमुळे सोशल नेटवर्किंगसारख्या सार्वजनिक माध्यमांवरुन या दोघांनी एकमेकांना सुनावल्याचं अनेकदा पहायला मिळालंय. विवेक अग्निहोत्रींना तर एकदा स्वरासंदर्भातील एक ट्विट मागेही घ्यावं लागलं होतं. सध्या प्रदर्शित झालेल्या आणि देशभरामध्ये चर्चेत असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने विवेक अग्निहोत्री पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील बडी नावं आणि कलकार या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या पाठीशी उभे राहिले नाही अशी खंत बोलू दाखवलीय. मात्र आता यावरुनच स्वराने अप्रत्यक्षपणे त्यांना टोला लगावलाय.
नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भात पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य; BJP च्या बैठकीत खासदारांना म्हणाले, “असे चित्रपट…”
विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटामध्ये ९० च्या दशकामध्ये काश्मीरमधील पंडितांवर झालेले हल्ल्यांबद्दल भाष्य करण्यात आलंय. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केलीय. मात्र असं असतानाही या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीमधील अनेकांनी काहीही न बोलणं पसंत केल्याचं दिसत आहे. अभिनेत्री कंगणा रणौतहीनेही बॉलिवूडवर टीका करणारी एक इन्स्टास्टोरी या चित्रपटाच्यानिमित्ताने पोस्ट केलीय.
अभिनेत्री स्वरानेही या चित्रपटाबद्दल आपल्याला पाठिंबा दिला जात नसल्याचं म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना टोला लगावलाय. तुम्ही यापूर्वी लोकांशी कसे वागले आहात असं सूचित करत स्वराने विवेक यांना टोला लगावलाय. “कोणी तरी येऊन तुमच्या ‘यशासाठी’ तुमचं अभिनंदन करावं असं वाटत असेल तर आधीची पाच वर्षे तुम्ही त्यांच्या डोक्यावर घाण करता कामा नये,” असं स्वराने म्हटलंय.
नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
स्वराने हा टोला विवेक अग्निहोत्रींना लागवल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या उजव्या विचारसणीसाठी ओळखले जातात. मागील काही काळापासून अनेकदा त्यांनी वेगवगेळ्या प्रकरणांमध्ये आपली रोकठोक मतं व्यक्त केली आहेत. या मतांवरुन त्यांनी काहींनी पाठिंबा दर्शवलेला तर काहींनी विरोध केलेला. या रोकठोक मतांमध्ये अग्निहोत्री यांनी अगदी चित्रपटांपासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवरही भाष्य केलंय. त्यामुळेच त्यांनी हे भाष्य करताना ज्यांना दुखावलंय ते आता त्याचं अभिनंदन कसं करतील असा स्वराच्या टीकेचा रोख आहे.
अनेकांनी या वक्तव्यावरुन स्वरालाच ट्रोल केलंय.
१) त्यांनी महत्वाचे म्हटलं होतं, त्यात तू नाहीस
२) लोकांना तुझ्यासाठी वेळ नाही…
३) तू पण बघ
४) तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला देण्यात आलेल्या रेटिंगने हिला काही त्रास नाही
५) रेटिंग्सची तुलना
सोशल नेटवर्किंगवर सध्या ‘द कश्मीर फाइल्स’वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केलेत. दोन्ही बाजूने या चित्रपटाबद्दल बोललं जात असतं तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरु ठेवलीय हे सुद्धा विशेष आहे.