सध्या बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड चांगलाच जोर धरू लागला आहे. जसजशी वेळ पुढे जात आहे हा ट्रेंड आणखीनच व्हायरल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या तिकीटांची विक्री पाहता एक वेगळंच चित्र समोर निर्माण होत आहे. नुकतंच रणबीर, आलिया आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिरात जण्यापासून रोखलं गेलं. यावरून अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत ट्वीट करत तिचं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर ज्या पद्धतीने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला बॉयकॉट करण्यासाठी जे हातखंडे वापरण्यात येत आहेत त्यापैकीच एक उदाहरण म्हणून तिने एका युझरने शेअर केलेल्या पोस्टचा फोटो शेअर केला आहे. या सगळ्या बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडला ‘धंदा’ असं स्वराने संबोधलं आहे. ट्विटरवरील एका पेजवर ब्रह्मास्त्रला बॉयकॉट का केलं पाहिजे याची कारणं लिहिलेली एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर कर स्वराने लिहिलं आहे की, “हा तर धंदा आहे, सर्वात जास्त नफा मिळवून देणारा धंदा बॉयकॉट बॉलिवूड”.

यामुळे स्वरा पुन्हा ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या या वक्तव्यामुळे लोकं प्रचंड खिल्ली उडवत आहेत. मध्यंतरी स्वराने या बॉयकॉट ट्रेंडविषयी तिचं मत मांडलं होतं. जे चित्रपट फ्लॉप झाले ते बॉयकॉट ट्रेंडमुळे अजिबात फ्लॉप झाले नसल्याचं वक्तव्य स्वराने केलं होतं. स्वराने झुम चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “बॉयकॉट ट्रेंडमुळे बॉलिवूडचं नेमकं किती नुकसान झालंय ते मला ठाऊक नाही. पण सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर आलिया आणि तिच्यासारख्या अनेक स्टारकीडच्या बाबतीत बऱ्याच नकारात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. मी तर अशा बऱ्याच बॉयकॉट ट्रेंडचा सामना केला आहे.”

आणखी वाचा : Photos : ‘या’ फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्या दिवशी केलेली कमाई पाहून डोळे पांढरे पडतील

स्वराच्या या विधानामुळे कित्येक लोकांनी तिची खिल्ली उडवली आहे. ती तिच्या अशाच बेधडक वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असते. स्वरा याआधीसुद्धा बॉलिवूडच्या बाजूने उभी राहिल्याने बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. CAA च्या विरोधात बोलतानासुद्धा स्वराला लोकांनी बरंच ट्रोल केलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.