सेलिब्रिटी किड्स हे सध्या त्यांच्या प्रसिद्ध आई-वडिलांपेक्षाही अधिक चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिवूडमध्ये शाहरुखचा मुलगा अब्राम खान, करिना – सैफचा मुलगा तैमुर अली खान, अभिषेक – ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन, शाहिद – मीराची मुलगी मीशा कपूर, आमिर- किरण रावचा मुलगा आझाद खान ही मुलं माध्यमांचं लक्ष वेधताना दिसत आहेत. या मुलांची हलकीशी झलक टिपण्यासही कॅमेरे सज्ज असतात. अशातच आपली मराठी सेलिब्रिटी मुलं तरी कशी मागे राहतील. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच स्वप्नील जोशीची मुलगी मायरा सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधतेय.

स्वप्नीलचा मुलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्वप्नील गाणं बोलतोय तर त्याची मुलगी मायरा त्याला साथ देतेय. या क्यूट व्हिडीओने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

‘मायरा तुझा माझ्यावर भरोसा नाय काय, मायराला हाय एक आई, आई म्हणते अग्गंबाई, आईची काळजी किती गोड गोड, मायरा तू आईशी गोड बोल’, हे गाणं स्वप्नील म्हणतोय आणि मायराने त्याला साथ दिली आहे. आरजे मलिश्काने गायलेल्या ‘मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय’ या गाण्यावरून स्वप्नीलने मायराच्या आईसाठी या चार ओळी गायल्या आहेत.

Story img Loader