सेलिब्रेटी म्हटलं की सहकलाकारांशी नाव जोडलं जाणं, लव्हस्टोरी, ब्रेकअप, लग्न आणि मग काही वर्षांनी घटस्फोटांची वृत्त या गोष्टी आता नवीन नाहीत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडपी आतापर्यंत एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. ज्याच्या सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या यादीत आता प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या पत्नीने न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रॅम्बो’ चित्रपटातून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध मिळालेले प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या पत्नीने तब्बल २५ वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार जेनिफर फ्लाविन यांनी पाम बीच काऊंटी येथील एका न्यायालयात ७६ वर्षीय सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. फ्लाविन आणि सिल्वेस्टर स्टेलॉन यांनी १९९७ मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात १९८८ मध्ये कॅलिफोर्नियाच्या बेवर्ली हिल्समधील एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. आता लग्नाच्या २५ वर्षांनंतर ही जोडी विभक्त होत आहे.
आणखी वाचा- Bus Bai Bus : ‘कोण होतीस तू, काय झालीस…’ गाणं ऐकल्यावर किशोरी पेडणेकरांना आठवल्या भाजपाच्या ‘या’ नेत्या

मे महिन्यात दोघांनी त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान अभिनेते सिल्वेस्टर यांनी आपल्या पत्नीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं, ‘लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. २५ वर्षे अशीच जावो हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.’ सिल्वेस्टर स्टेलॉन यांची पत्नी फ्लाविननेही २५ व्या वाढदिवसानिमित्त एक विशेष पोस्ट शेअर केली होती मात्र नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.