बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या सामन्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यासोबत अक्षय कुमार, मौनी रॉय यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. मात्र या सर्व सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. सध्या उर्वशीचे सामन्यादरम्यान भारतीय संघाला प्रोत्साहन देतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-पाकिस्तान टी २० सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सध्या सोशल मीडियावर कालच्या सामन्यातील बरेच फोटो व्हायरल होत आहेत. यात उर्वशी रौतेलाच्या फोटो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांसह उर्वशीही भारताला चीअर करण्यासाठी दुबईच्या स्टेडिअमवर पोहोचली होती. मात्र तिला पाहताच अनेकांनी तिला ऋषभच्या नावाने चिडवण्यास सुरुवात केली.

विशेष म्हणजे उर्वशीही ऋषभ पंतच्या फलंदाजीदरम्यान त्याला चीअर करताना दिसत होती. तसेच पंतच्या प्रत्येक चौकार षटकारावर तिने भारताचा तिरंगा फडकावला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उर्वशीने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर याची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. गेल्यावर्षी या दोघांच्या डिनर डेटचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. उर्वशी आणि ऋषभ हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र त्यानंतर या सर्व अफवा असल्याचे समोर आलं.

विशेष म्हणजे ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याचेही बोललं जाते. काही दिवसांपूर्वी ऋषभने त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिच्यासोबत काही फोटोही शेअर केले होते. यानंतर आता अनेकदा त्या दोघांचे फोटो समोर येत असतात. मात्र कालच्या सामन्यात उर्वशीच्या पंतच्या फलंदाजीदरम्यान प्रोत्साहन देत असल्याचे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

असा रंगला सामना…

बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.