मागच्या काही काळापासून करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ७’ हा शो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आतापर्यंत आलिया भट्ट आणि रणवीर सिंगपासून ते जान्हवी कपूर, अक्षय कुमार, आमिर खान, करीना कपूर खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या चॅट शोमध्ये दिसले आहेत. मात्र अभिनेत्री तापसी पन्नू एकदाही या शोमध्ये दिसलेली नाही किंवा करणने तापसीला त्याच्या शोमध्ये अद्याप आमंत्रित केलेलं नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य करत तापसीनं करण जोहरच्या शोमध्ये न दिसण्याचं कारण सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करण जोहरच्या शोमध्ये न दिसण्यामागचं तापसी पन्नूने जे कारण सांगितले ते ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. करण जोहर नेहमीच त्याच्या शोमध्ये सेलिब्रेटींच्या सेक्स लाइफ आणि खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. यंदाच्या सीझनमध्येही अक्षय कुमार आणि समांथा रुथ प्रभूच्या एपिसोड वगळता करण जोहर त्याच्या प्रत्येक सेलिब्रेटींना त्याच्या सेक्स लाइफबद्दल विचारताना दिसला. एवढंच काय तर त्याने आमिर खानलाही सोडलं नाही. अशात आता तापसी पन्नूने ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये न येण्याचं कारण सांगितल्यावर अनेकांना धक्का बसला आहे. शोमध्ये न येण्याचं कारण सांगताना तापसीने अप्रत्यक्षपणे करणला टोला लगवला आहे.

आणखी वाचा- “चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा पंजाबीच का?” नागराज मंजुळेंच्या प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर

तापसी पन्नू सध्या तिचा आगामी चित्रपट ‘दोबारा’ प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत तिला जेव्हा करण जोहरच्या चॅट शोमध्ये न येण्याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा तापसी म्हणाली, ‘कदाचित माझं सेक्स लाइफ एवढं मजेदार नाही की मला करणच्या ‘कॉफी विथ करण’साठी आमंत्रित केलं जावं. त्यामुळे मी अद्याप या शोमध्ये दिसले नाहीये.” अभिनयाव्यतिरिक्त, तापसी पन्नू तिचं नॉलेज आणि सेन्स ऑफ ह्यूमरसाठी ओळखली जाते. तापसीच्या या उत्तराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ‘काफी विथ करण ७’चे आतापर्यंत प्रसारित झालेले बहुतांश भाग हे सेलिब्रिटींच्या सेक्स लाइफ आणि बेडरुम सीक्रेट्समुळे चर्चेत राहिले आहेत. याची तापसीने खिल्ली उडवल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान तापसी पन्नून ‘कॉफी विथ करण’ शोवर याआधीही एकदा टीका केली होती. २०१९ मध्ये, जेव्हा ‘कॉफी विथ करण’ ‘कॉफी अवॉर्ड नाईट’चा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला, तेव्हा त्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. वीर दासचाही त्यात समावेश होता. त्यानंतर वीर दासने ट्विटरवर टीझर शेअर करताना त्यात तापसीला टॅग करत म्हटलं होतं की, ‘सेट एवढा ‘पिंक’ आहे की तापसी पन्नूने त्यावर अभिनयही केला.’ वीर दासच्या या ट्वीटला तापसी पन्नूने उत्तरही दिलं होतं. तिने लिहिलं होतं, ‘तुम्हा सर्वांना दूरून पाहून मला आनंद होतोय. मी करणच्या शोसाठी पात्र ठरू शकले नाही हे चांगलंच आहे. मला कॉफी शोमध्ये जाण्याची गरज नाही.’

आणखी वाचा- “ती मुलगी माझ्या प्रेमात होती आणि मलाही…” तापसीने सांगितला गोव्यात घडलेला किस्सा

तापसीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा ‘दोबारा’ चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात नस्सर, राहुल भट्ट, हिमांशी चौधरी आणि शाश्वत चॅटर्जी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘दोबारा (२,१२)’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे.