दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचं कौतुक होताना दिसत आहे. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अनुराग कश्यप एवढ्यावर खूश नसल्याचं दिसून येतंय. मागच्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ज्याप्रमाणे बहिष्कार टाकला जात आहे, त्याचप्रमाणे आपल्या चित्रपटावरही बहिष्कार टाकावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू त्यांच्या ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यावेळी त्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट प्रमोशनच्या वेळी अनुराग कश्यप असं काही बोलला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने बहिष्काराच्या या ट्रेंडचा चित्रपटांना फायदाच होत असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा- “माझं सेक्स लाइफ…” तापसीने सांगितलं ‘कॉफी विथ करण’मध्ये न दिसण्याचं धक्कादायक कारण

चित्रपटांच्या बहिष्काराच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना अनुराग कश्यप म्हणाला, ‘मला यामुळे बाहेर टाकल्यासारखं वाटतंय. कोणाचंही माझ्याकडे किंवा माझ्या चित्रपटाकडे लक्ष नाही. मलाही वाटतंय की माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालायला हवा. कृपया ट्विटरवर माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा हॅशटॅग ट्रेंड करा. यावर तापसी पन्नूही अनुराग कश्यपचा पाठिंबा देत म्हणाली, ‘हो, कृपया ‘बॉयकॉट दोबारा’ सोशल मीडियावर ट्रेंड करा. आम्हाला ट्विटरवर ट्रेंड व्हायचं आहे.

आणखी वाचा- तापसी पन्नूशी फोटोग्राफर्सनी घातला वाद, हात जोडत अभिनेत्री म्हणाली “तुम्ही नेहमीच…”

दरम्यान अनुराग कश्यपच्या ‘दो बारा’मध्ये तापसी आणि पावेल पुन्हा एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघे २०२० मध्ये ‘थप्पड’ चित्रपटात एकत्र दिसले होते. ‘दो बारा’ हा एक साय-फाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिरेज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. येत्या १९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.