बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘रश्मि रॉकेट’ या तिच्या आगामी चित्रपटांमुळे तापसी चर्चेत आहे. तापसी तिच्या या आगामी चित्रपटासंबंधीत अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत तापसीची मस्कुलर बॉडी पाहायला मिळत आहे. तापसीची बॉडी पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं आहे. दरम्यान, अशाच एका नेटकऱ्याला तापसीने सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तापसीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘रश्मि रॉकेट’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तापसीची पाठ दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘डोक्यावर बसून ठेवलं आहे, कोणाचही ऐकत नाही, पण स्वतः ऐकते… ही एक मोठी गोष्ट आहे. वादळापूर्वीची शांतता,’ अशा आशयाचे कॅप्शन तापसीने दिले आहे.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

तापसीची ही पोस्ट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने, ‘पुरुषासारखी बॉडी असणारी ही फक्त तापसी पन्नू असु शकते,’ अशी कमेंट केली होती. यावर उत्तर देत तापसी म्हणाली, ‘फक्त हे वाक्य लक्षात ठेवा आणि २३ सप्टेंबर पर्यंत प्रतिक्षा करा. यासाठी आधीच धन्यवाद, या स्तुतीसाठी खूप मेहनत घेतली आहे.’

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं होतं भाष्य म्हणाली…

आणखी वाचा : २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

तापसीचा ‘रश्मि रॉकेट’ हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. हा चित्रपट नंदा पेरियासामी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिलगांवकर दिसणार आहे.