Legendary Comedian Raju Srivastava Died at 58 : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण मनोरंजन विश्वाला दुःखद धक्का बसला. कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार मंडळींनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त करत आपण आपला लाडका कलाकार गमवला असल्याचं म्हटलं. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कलाक्षेत्रातील मंडळी आपल्या लाडक्या कलाकाराबाबत बोलत असताना तापसी पन्नू मात्र ट्रोल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तापसी पन्नूचा व्हिडीओ व्हायरल

तापसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच तिने मुंबईमध्ये एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. चित्रपटाचं स्क्रिनिंग संपल्यानंतर ती बाहेर आली. यादरम्यान तिला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी तिला पापाराझी छायाचित्रकारांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबाबत विचारलं. यावेळी तिने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना काही पटलं नाही.

पाहा व्हिडीओ

ती म्हणाली, “अरे तुम्ही आधी बाजूला व्हा. असं करू नका. अजून थोडं इथून बाजूला व्हा.” असं म्हणत धन्यवाद म्हणून तापसी तिथून निघून गेली. तापसीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना तिचं वागणं अजिबात पटलं नाही. त्यामुळे तापसीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

आणखी वाचा – Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

तुम्ही या कलाकारांच्या मागे का धावता?, तापसी पन्नूचे सुरक्षारक्षक कुठे गेले? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच राजू श्रीवास्तव यांच्याबाबत प्रश्न विचारताच ती काही न बोलताच निघून गेल्याने तापसीला ट्रोल करण्यात येत आहे.