अभिनेत्री तापसू पन्नूचा तेलगू चित्रपट ‘गेम ओवर’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तापसीचा हा तेलगू चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘गेम ओवर’चे पोस्टर सर्वत्र लावण्यात आले आहेत. याचाच एक फोटो तापसीने शेअर केला असून या फोटोला एक मजेशीर कॅप्शनदेखील दिले आहे.
तापसीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तापसीचा आगामी चित्रपट ‘गेम ओव्हर’चे पोस्टर आहे. या पोस्टरच्या डाव्याबाजूला हॉलिवूड चित्रपट ‘एमआयबी’चे पोस्टर आहे तर उजव्या बाजूला सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहे. आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर दोन चित्रपटांच्या पोस्टरमध्ये पाहून तापसीने सॅन्डविमधील स्टफिंग झाल्याचे असल्याचे सांगितले आहे.
I feel like a sandwich stuffing! N my expression on the poster shall validate that! https://t.co/jEIK57phtw
— taapsee pannu (@taapsee) June 8, 2019
‘मला सॅन्डविचमधील स्टफिंग झाल्यासारखे वाटत आहे आणि पोस्टरवरील माझे भाव याचा पूरावा आहेत’ असे तापसीने पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले आहे. तापसीने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर अनेक चाहत्यांनी हस्यास्पद कमेंटही दिल्या आहेत.
‘गेम ओव्हर’ हा एक थरारपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अंगावर काटे येतील असे काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट तमिळसह हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवनन करणार असून हिंदीमध्ये अनुराग कश्यप सादर करणार आहे. तसेच हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.