अभिनेत्री तापसी पन्नू ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पिंक, थप्पड यांसारखे सुपरहिट चित्रपट देऊन तापासीने इंडस्ट्रीत खूप नाव कमावले आहे. अलीकडेच तिचा ‘दोबारा’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कठीण काळातून जावे लागेल असे दिसते. या चित्रपटात तापसी सोबत पावेल गुलाटी आणि राहुल भट यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे आणि हा चित्रपट तयार करण्याचं बजेट होतं ५० कोटी.
आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमागे ‘भाजपा’? विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा
अलीकडेच, ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थिएटरमध्ये फक्त २-३ टक्के प्रेक्षक संख्या अनुभवली. चांगली स्टारकास्ट, उत्तम दिग्दर्शक या चित्रपटाला लाभला असूनही चित्रपट बघायला प्रेक्षकांनी उत्साह दर्शवला नाही. या कारणास्तव ‘दोबारा’चे पहिल्याच दिवशी अनेक शो विविध ठिकाणच्या थिएटरमध्ये रद्द करण्यात आले.
ट्विटरवरील व्यापार विश्लेषकांच्या मते, “तापसी पन्नूचा ‘दोबारा’ बॉक्स ऑफिसवर सर्वात कमी पैसे कमावणारा चित्रपट असेल.” या चित्रपटला फक्त २-३ टक्के प्रेक्षक उपस्थिती लावताना दिसत आहेत. तर पहिल्या दिवसांचे अनेक शो प्रेक्षक नसल्यामुळे रद्द होत आहेत.याशिवाय, तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘दोबारा’ बॉक्स ऑफिसवर खूप कमी कमाई करेल, असे व्यापार विश्लेषकांचे मत आहे. त्यांच्या अंदाजानुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी फक्त २० ते २५ लाख रुपये कमावल्यावर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची एकूण कमाई सुमारे १.२५ ते १.५० कोटी रुपयांची असेल.
हेही वाचा : “आपल्या देशात आता…” बॉलिवूड चित्रपटांना होणाऱ्या विरोधाबाबत अनुराग कश्यपचं मोठं वक्तव्य
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग आणि तापसी यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’ला प्रेक्षकांनी बॉयकॉट कारावं अशी विनंती केली होती. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.. “ज्याप्रमाणे आमिर आणि अक्षयसारख्या सुपरस्टार्सना बॉयकॉट करून लोकांनी डोक्यावर घेतलं आहे त्याप्रमाणे आम्हालाही बॉयकॉट करून ट्रेंड होऊ द्या!” असं विचित्र वक्तव्य त्यांनी या मुलाखतीत केलं होतं. त्यावरच उत्तर म्हणून प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.