‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दया बेनच्या जोडीने लोकप्रियतेचा शिखर गाठला होता. त्यासोबत या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत आत्माराम भिडे हे पात्र मंदार चांदवडकर साकारत आहे. नुकतंच मंदारच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र मंदारने इन्स्टाग्राम लाइव्ह करत या वृत्ताचे खंडन केले आहे. ‘मी पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी आहे’, असे मंदार चांदवडकर म्हणाला.
मंदार चांदवडकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत या वृत्ताचे खंडन केले आहे. ‘मी पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी आहे. सोशल मीडियावर माझ्या निधनाचे व्हायरल होणारे वृत्त खोटे आणि निराधार आहे.’ असे त्याने म्हटले आहे.
“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक
मंदार चांदवडकर काय म्हणाले?
“नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात? मला आशा आहे की सर्व काही व्यवस्थित चालले असेल. मी देखील काम करत आहे. काही वेळापूर्वी एका व्यक्तीने मला एक बातमी फॉरवर्ड केली होती. त्यामुळेच मला वाटले की लाइव्ह जाऊन सर्वांचे गैरसमज दूर करावे. माझे चाहते फार चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अनेक अफवा वेगाने पसरत आहेत. मला फक्त याबाबतची पुष्टी करायची आहे की मी शूटिंग करत आहे आणि एन्जॉय करत आहे.”
“ज्याने कोणी ही बातमी पसरवली असेल, त्याला मी विनंती करते की त्यांनी हे सर्व करणे थांबवावे. देव त्याला सद्बुद्धी देवो. तारक मेहता का उल्टा चष्माचे सर्व कलाकार निरोगी आणि आनंदी आहेत. प्रत्येकाला भविष्यात अधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे. त्यानुसार लोकांचे मनोरंजन व्हावे अशी माझी आशा आहे”, असे मंदार चांदवडकरने म्हटले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. २००८ मध्ये सुरु झालेला हो कार्यक्रम गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या शोचे ३३९३ भाग पूर्ण झाले आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र घरोघरात लोकप्रिय आहे. जेठालाल, आत्माराम भिडे, पोपटलाल, डॉ. हाथी, कोमल भाभी, अंजली भाभी, माधवी, दयाबेन यांच्यासारखे अनेक कलाकार हे आता घराघरात लोकप्रिय ठरले आहेत.