‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार हा लोकप्रिय आहे. अभिनेत्री आराधना शर्माची लोकप्रियता ही या मालिकेत आल्यापासून चांगलीच वाढली आहे. आराधना ही नेहमीच पडखर पणे तिचं मत मांडताना दिसते. यावेळी आराधनाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील अशी एक घटना सांगितली की ऐकूण सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आराधनाने नुकतीच ‘इंडिया डॉटकॉम’ला मुलाखत दिली होती. यावेळी तिने सांगितलं की जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होतीय तेव्हा त्याने तिच्याकडे शरीरसुखाची डिमांड केली होती. यासाठी आराधना तयार नव्हती. परंतु तो मुलगा बळजबरी करत होता. त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, आराधनाने सरळ नाही सांगत म्हणाली, “नाही म्हणजे नाही…”

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

आणखी वाचा : लॉस एंजलिसमध्ये प्रियांकाने निकसोबत केलं लक्ष्मी पूजन, फोटो व्हायरल

दरम्यान, या आधी एका मुलाखतीत आराधनाने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आराधनाने तिल्या १९ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचं सांगितलं आहे. एका कास्टिंग एजंटने आराधनासोबत केलेल्या त्या कृत्यामुळे तिला आता अनेक पुरुषांवर विश्वास ठेवणं कठिण जात असल्याचं ती या मुलाखतीत म्हणाली. “ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. चार पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. तेव्हा मी पुण्यात शिक्षण घेत होते. यावेळी मी थोडफार मॉडेलिंग देखील करायचे. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत असल्याचं मला कळालं. मात्र त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो. आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्याने मला विचित्रपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.” असं आराधना म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta fame aradhana sharma says boyfriend demanded sex on first date dcp