‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मागच्या बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दयाबेन गोकुळधान सोसायटीमध्ये परतणार असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या प्रोमोनंतर शोमध्ये दिशा वकानी पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं पण अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत निर्माते असित मोदी यांनी दिशा वकानी शोमध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर शोचे चाहते मेकर्सवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असिद मोदी म्हणाले, “शोमध्ये दयाबेनची व्यक्तीरेखा पुन्हा एकदा दिसणार आहे. मात्र ही भूमिका दिशा वकानी साकारणार नाही. दिशाच्या रिप्लेसमेंटसाठी ऑडिशन सुरू आहेत आणि लवकरच नवी अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारताना दिसणार आहे. आम्हाला अपेक्षा होती की, दिशा परत येईल. पण त्यानंतर करोना आणि लॉकडाऊन अशा सर्व गोष्टी घडल्या. अशात शूटिंगसाठी बरेच निर्बंध होते आणि त्याकाळात शूटिंग करण्यास दिशाला भीती वाटत होती. दिशा आणि शोचं खूप जुनं नातं आहे त्यामुळा आम्ही वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आजही दिशा अधिकृत स्तरावर या शोचा भाग आहे, आमच्या कुटुंबाचा भाग आहे. अलिकडेच ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे ती शोमध्ये परतणार नाही.”

आणखी वाचा- “मी पॉर्नस्टार होते त्यामुळे…” मुलांबाबत सनी लिओनीला सतावतेय ‘ही’ भीती

असित मोदी यांच्या स्पष्टीकरणानंतर चाहत्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या मेकर्सना सोशल मीडियावरून धमकी द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं, ‘मला वाटलंच होतं असंच होणार आहे.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘दिशा शोमध्ये दिसणार नसेल तर मग आता हा शो बंद करा. कमीत कमी आता पर्यंत जे लोकप्रियता मिळवली ती तरी कायम राहिल. पुन्हा पुन्हा जुन्या स्टोरी दाखवण्याची गरज नाही.’ तर काही युजर्सनी तर मेकर्सना थेट धमकीच दिली आहे. एका युजरनं लिहिलं, ‘आता पुन्हा दयाबेनच्या घरी परतण्यावरून काही गेम खेळलात तर पाहा मी हा शोच बंद करून टाकेन. कारण तसंही आता या शोची लोकप्रियता कमी होत चालली आहे.’

आणखी वाचा- व्हायरल इंटीमेट फोटो ते विवाहित अभिनेत्याशी अफेअर, वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिली नयनतारा

दरम्यान दिशा वकानी मागच्या ५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिसलेली नाही. २०१७ मध्ये प्रेग्नंसीच्या कारणानं दिशानं या शोमधून ब्रेक घेतला होता. अलिकडेच मे महिन्यात तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दिशाला दयाबेनच्या भूमिकेत प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यामुळे नव्या दयाबेनला दिशासारखी लोकप्रियता मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka oolta chashma disha vakani is not returning to the show users angry reaction on makers mrj