छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेले १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, पोपटलाल, तारक मेहता ही सर्वच पात्र कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून मालिकेची सीरिज ओटीटीवर सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर मालिकेचे लेखक अब्बास हिरापुरवाला यांनी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे लेखक अब्बास यांनी ‘स्क्रीन राइटर असोसिएशन अॅवॉर्ड’ या कार्यक्रमात एक मोठा खुलासा केला आहे. त्यांना मालिकेच्या सीरिज विषयी विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘मला नाही वाटत की आता मालिकेला वेब सीरिजच्या रुपात ओटीटीवर प्रसारित करता येईल. ही मालिका मोठी आहे. मालिका आणि वेब सीरिज पाहणारा प्रेक्षक वर्ग देखील वेगळा आहे. त्यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आता सीरिजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे वाटत नाही.’
Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ चर्चेत

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका २००८ साली सुरु झाली होती. या मालिकेचे जवळपास ३ हजार ३८२ भाग प्रसारित झाले आहेत. ही मालिका छोट्या पडद्यावरील बराच काळ सुरु असणारी मालिका ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते.