छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढाने मालिका सोडली आहे. शैलेश लोढाने मालिका सोडल्याच्या बातमीने तर प्रेक्षकांना धक्काच बसला होता. आता शैलेश लोढानंतर आणखी एका कलाकाराने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : मलायकाच्या घरी पोहोचले पोलिस, व्हिडीओ व्हायरल होताच कारण आले समोर

‘तारक मेहता…’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या काही एपिसोडमध्ये दिसत नाही आहे. यामुळे तो लवकरच तारक मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे माहीत नाही, पण लवकरच त्याबाबतही स्पष्टता येईल.

आणखी वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची एकूण संपत्ती आणि कमाई ऐकलीत का?

आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही

‘तारक मेहता…’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. सोढीची भूमिका करणारा गुरचरण सिंग असो, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदौरिया असो किंवा शोमध्ये अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता असो. याशिवाय सोनूच्या भूमिकेतील २ अभिनेत्रींनी मालिका सोडल्या आहेत. तर सगळ्यात पहिले टप्पूची भूमिका साकारलेल्या भव्य गांधीने देखील मालिका सोडली होती.

आणखी वाचा : कोण आहे सोनाक्षीचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल? तिच्या आधी ‘या’ दोन अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये

त्याच वेळी, या सर्व कलाकारांनी शो सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, दयाबेन मालिकेत परत येणार असल्याची बातमी समोर येत आहे. पण आपल्या सगळ्यांची लाडकी दिशा वकानी दयाबेनच्या भूमिकेत दिसणार नसून दुसरी अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah after shailesh lodha did tappu aka raj anadkat also leave the show dcp