‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, चंपकलाल, हाती, बाघा हे कलाकार सतत चर्चेत असतात. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बाघा ही भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील चंपकलाल कोणता हे तुम्ही ओळखू शकता का?
तन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २००७ मधील ऑस्ट्रेलियातील हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका गुजराती नाटकाच्या वेळी काढलेला आहे. या फोटोमध्ये जेठालाला, बाबू जी, बाघा असल्याचे दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करत त्याने ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आणखी एक फोटो. या फोटोत देखील अमितजी पाठी आहेत असे कॅप्शन तन्मयने दिले आहे.
आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ
तन्मयने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चंपकलालला ओळखणे देखील कठीण झाले आहे. दिलीप जोशी यांनी लाल रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर चंपकलाल यांनी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.