छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहे. यावेळी मालिकेतील एका लहानमुलींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या मुलीचा हा फोटो शोमध्ये बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकरियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तन्मयने या गोंडस मुलीचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. याफोटो ती मुलगी आणि बाघा दिसत आहे. त्या मुलीने गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. तर बाघाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत “या गोंडस मुलीला ओळखलत का?” असा प्रश्न बाघाने विचारला आहे.
आणखी वाचा : ३२०० कैद्यांसोबत राहतो आर्यन खान, शाहरुख आणि गौरीच्या मुलावर आहेत हे निर्बंध
आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!
दरम्यान, ही गोंडस मुलगी जेठालाल आणि दयाबेनची लाडकी खुशी आहे. मालिकेत काही एपिसोडमध्ये आपल्याला खुशी दिसली होती. खरतंर दयाबेनला खुशी एक सुनसान रस्त्यावर भेटली होती. त्यानंतर दयाबेन तिला घरी घेऊन आली होती. चौकशी केल्यानंतर समोर आले की खुशीच्या आईने तिला मुद्दामुन तिथे सोडले होते. कारण तिला मुलगा पाहिजे होता. तर गोकुलधाम सोसायटीत आल्यानंतर खुशीने सगळ्यांची मने जिंकली होती. एवढंच काय तर दयाबेन आणि जेठालाल तिला दत्तक देखील घेणार होते.