पंजाबमध्ये राहणारी ९ वर्षांची मुलगी सुमन पुरी सध्या इंटरनेट सेंसेशन झाली आहे. तिने छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दयाबेनची नक्कल केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सुमनच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे.

सुमन पुरीने जो व्हिडीओ शेअर केला आहे या व्हिडीओमध्ये ती दयाबेनच्या गेटअपमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी ‘छोटी दयाबेन’ अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’चे खरे फॅन असाल तर फोटोमधील चंपकलालला ओळखून दाखवाच

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीने दयाबेन ही भूमिका साकारली आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून दिशा मालिकेत दिसत नाही. त्यामुळे दयाबेनला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ती पुन्हा कधी मालिकेत दिसणार असे अनेकदा निर्मात्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जाते.

२०१७मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. आता दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

Story img Loader