‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दया बेन या जोडीने तर लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. या मालिकेत त्या दोघांचे पात्र नेहमीच प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच या दोघांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात दयाबेन आणि जेठालाल एका शोमधील डान्स परफॉर्मन्सचा सराव करत असल्याचे दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी चांगलीच प्रसिद्ध ठरली होती. या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले आहे. यादरम्यान त्यांनी अनेक स्पेशल एपिसोड, अॅवॉर्ड शो, स्टेज शो यासारख्या कार्यक्रमात हजेरी लावली. अशाच एका कार्यक्रमातील डान्स सरावाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी ही पायजमा आणि शर्टमध्ये दिसत आहे. तर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे तिच्यासोबत नृत्याचा सराव करताना पाहायला मिळत आहे. यावेळी त्या दोघांसोबत त्या ठिकाणी एक नृत्य प्रशिक्षकही असल्याचे दिसत असून ती त्यांना या डान्सच्या काही स्टेप्स शिकवताना पाहायला मिळत आहे.
हे दोघेही एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ २०१७ च्या पूर्वीचा असल्याचे बोललं जात आहे. कारण २०१७ मध्ये दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नंसीमुळे मालिका सोडली होती.
दरम्यान या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर एका नेटकऱ्याने ‘मला हे गाणे खूप आवडते आणि दिलीप सरांना डान्सही,’ अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने ‘दया भाभीला परत आणा,’ अशी मागणी कमेंटमध्ये केली आहे. ‘कृपया दयाभाभीला शोमध्ये परत आणा, ही जोडी सुपरहिट आहे,’ असेही एकाने म्हटले आहे.