गेली कित्येक वर्षे टीव्हीवर प्रेक्षकांचं खळखळून हसवणारा कॉमेडी शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. या मालिकेची यशस्वी घौडदौड सुरुच आहे. या मालिकेतील दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या घराघरांतील एक अविभाज्य भाग बनले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील बच्चे कंपनी देखील आता मोठी झाली आहे. यातील अनेक कलाकारांनी या मालिकेला मधूनच रामराम केला आहे, तर काही कलाकार हे मालिकेच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत मालिकेशी जोडले गेले आहेत. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे मास्टरच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी भानुशाली ही आता एका बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

निधी भानुशाली ही नेहमीच तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. निधी ही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. निधी कायमच अगदी फॅशनेबल आणि एडवेंचर्स लाइफ जगत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे बिकिनी फोटोज प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता निधीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिचा आणखी एकदा अतरंगी आणि बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत निधी एका गाण्यावर नाचताना, गाताना दिसत आहे. यावेळी तिने विविध बिकिनी परिधान केल्या आहेत. यात ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.  विशेष म्हणजे या संपूर्ण गाण्यात तिने गोव्याची संपूर्ण झलक दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या काही मित्र मैत्रिणींनी शेअर केला आहे. यापूर्वीही तिने अनेक रोड ट्रीपदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @ryora.lights

निधीसोबत या व्हिडीओत तिचे काही मित्र मैत्रिणही पाहायला मिळत आहे. यात सुरुवातीला निधी समुद्रकिनाऱ्यावर मज्जा करताना दिसत आहे. त्यासोबत पोहण्याची मज्जाही तिने अनुभवली आहे. विशेष म्हणजे यात तिने विविध बिकिनी परिधान केल्या असून ती प्रचंड बोल्ड दिसत आहे.

Story img Loader