तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. जवळपास गेली १३ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत सोनू ही भूमिका निधी भानुशालीने साकारली होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता निधीने तिच्या रिलेशनशीप विषयी खुलासा केला आहे.

निधीने आभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पण ती सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता निधीने बॉयफ्रेंड ऋषी अरोरासोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
Video: मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…; नीना गुप्ता यांचा खुलासा

निधीने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या रिलेशनशीपवर वक्तव्य केले आहे. तिला आणि तिचा बॉयफ्रेंड ऋषीला फिरण्याची प्रचंड आवड आहे. ते दोघेही त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन सतत फिरताना दिसतात. त्या दोघांनी महाराष्ट्र, लडाख, जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी ट्रिप केल्या आहेत. निधीचे फिरतानाचे फोटो हे सोशल मीडियावर कायच चर्चेत असतात.

दरम्यान, निधीने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील ‘टप्पू’ला डेट करण्याच्या अफवांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. निधी ही भव्य गांधीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व केवळ अफवा असल्याचे निधीने स्पष्ट केले. त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचे नाते होते असे निधीने म्हटले आहे.

Story img Loader