छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या अनेक १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोनू चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच निधीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निधीने बोहो स्टाइल ब्रालेट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. निधीचा हा मिरर सेल्फी नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. यासोबत निधीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती क्रोशियाचं कामं शिकत असल्याचं दिसतं.
आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी
आणखी वाचा : “I love myself but…”, रितेशन शेअर केला जिनिलियासोबतचा रोमँटिक व्हिडीओ
हा फोटो शेअर करत निधीने कॅप्शन दिले की, “इथे बघण्यासारखं अस काहीच नाही. फक्त काही मिरर सेल्फी आणि माझं नवीन वेड, असे कॅप्शन निधीने दिलं आहे. सोनूच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षांव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, “सोनू बेटा मस्ती नही.” दुसरा नेटकरी म्हणाला, “आमच्या काळात असे कपडे कोणी परिधान करत नव्हते- भिडे भाऊ.” तिसरा नेटकरी म्हणाला, “सोनू तू तर खूप मोठी झालीसं गं.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “अरे सोनू तू बहुत चेंज हो गई है.”