‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासून नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, या नट्टू काकांनी आता आपला कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे ३ ऑक्टोबर रोजी कर्करोगाने निधन झाले. घनशाम यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर आधी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण ‘तारक मेहता…’च्या टीमकडून आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. यातच ‘तारक मेहता…’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकटने नट्टू काकांचा निधनापूर्वीचा सेटवरील एक शेवटचा फोटो शेअर केला आहे.

नट्टू काका यांच्यासोबतचा हा फोटो राजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात नट्टू काका आणि राज दोघेही व्हॅनिटी व्हॅनमध्ये असल्याचे दिसत आहे. त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. हा फोटो शेअर करत “मी आणि काका मेकअप शेअर करतो. ते खूप दिवसांनंतर सेटवर आले होते. त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि म्हटलं, ‘काय बाळा कसा आहेस?’ मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या,” अशा आशयाचे कॅप्शन राजने दिले.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते

आणखी वाचा : “उमेश माझा जुनाच गडी पण…”; लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त प्रियाचा खास उखाणा

पुढे राज म्हणाला, “इतक्या दिवसांनी सेटवर परत येऊन ते खूप आनंदात होते. त्यांनी मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारलं आणि म्हणाले, खूप छान देव तुझं भलं करो. या वयात त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती आणि मेहनत कौतुकास्पद होती. मी ते कधीच विसरू शकत नाही. काका तुम्ही नेहमीच आमच्या स्मृतीत राहाल.”

आणखी वाचा : “वर्तमानपत्राच्या ऑफिसबाहेर रात्रभर वाट पाहायचो…”, बिग बींनी सांगितला करिअरच्या सुरुवातीच्या काळातील किस्सा

घनश्याम त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करू इच्छित होते. त्यामुळे तब्येत ठीक नसतानाही ते ‘तारक मेहता…’ च्या चित्रीकरणासाठी येत होते. नट्टू काका यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

Story img Loader