छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. यामुळे दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. त्यासोबत तिच्या जागी दुसरी अभिनेत्री येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?
आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण या शोमध्ये दयाबेनची भूमिका परत पाहायला मिळणार आहे. पण आता या मालिकेत दिशा ही भूमिका साकारणार नाही तर हम पांच फेम स्वीटी उर्फ अभिनेत्री राखी विजान दयाबेनची भूमिका साकारणार आहे. राखी विजान बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. दिशाच्या भूमिकेत राखीला पाहणे चाहत्यांसाठी खरोखरच एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसेल.
आणखी वाचा : अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्यांवर भडकली कंगना, पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘आजतक डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, राखी विजन दयाबेनच्या भूमिकेत दिसणार आहे. राखी आणि क्रिएटिव्ह टीममध्ये या भूमिकेच्या स्क्रीन प्रेझेन्सबाबत बोलणी सुरू आहेत.
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राखी या भूमिकेत स्वत: चे वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या संदर्भात तिने टीमशी चर्चा केली आहे. राखीला दयाबेनसारखे हावभाव देणं शक्य होत नसल्याने ती तिच्या परिने ते सादर करायाचे आहेत. राखी स्वीटी ऑफ हम पांच या तिच्या प्रतिष्ठित पात्रासाठी देखील ओळखली जाते. आजही अनेक लोक तिला फक्त स्वीटी नावानेच ओळखतात. यामुळेच राखी वेळ काढत आहे जेणेकरून स्वीटी या भूमिकेतून बाहेर येत ती दयाबेनच्या भूमिकेत सगळ्यांसमोर येईल.
आणखी वाचा : “तू देशाचा पंतप्रधान आहेस का?”, मुस्लिमांची बाजू घेतल्यामुळे विशाल दादलानी झाला ट्रोल
दयाबेनसारख्या गाजलेली भूमिका साकारणे इतके सोपे नाही. कोणतीही अशी गालजेली भूमिका साकारणे एखाद्या अभिनेत्यासाठी दोन आठवड्यासाठी आव्हानात्मक असतं. रिप्लेसमेंट पहिल्यांदाच होत नाहीये, याआधीही अनेक गाजलेल्या भूमिका बदलून इतर कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. त्यामुळे टीम त्या दृष्टीने स्पष्टीकरण देत आहे.