छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. जेठालाल, बबिता, टप्पू, चंपकलाल, दयाबेन या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील जेठालालचे गडा इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानदेखील अतिशय लोकप्रिय आहे. पण दुकान कुठे आहे? कोणाचे आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाविषयी…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची कथा दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमधील पोपटलाल पत्रकार आहे, मेहता साहेब हे लेखक आहेत, आत्माराम तुकाराम हे कोचिंग क्लासेस घेतात आणि जेठालाल चंपकलाल यांचे गडा इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. जेठालालच्या दुकानात नट्टू काका, बाघा आणि मदन हे काम करतात. जवळपास मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये जेठालालचे दुकान दाखवण्यात येते.
आणखी वाचा : कोणी १४ वर्षांनी लहान तर कोणी ११, या अभिनेत्रींनी शोधला वयाने लहान असणारा लाइफ पार्टनर
View this post on Instagram
‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार जेठालालचे गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकान हे मुंबईतील खार परिसरात आहे. या दुकानाच्या मालकाचे नाव शेखर गडीयार असे आहे. शेखर हे चित्रीकरणासाठी दुकान भाड्याने देतात. पहिले या दुकानाचे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स असे होते. पण मालिकेत गडा इलेक्ट्रॉनिक्स या नावाने लोकप्रिय झाल्यानंतर त्यांनी नाव बदलून गडा इलेक्ट्रॉनिक्स असे ठेवले.
या दुकानाचे मालक दुकान भाड्याने देण्यास सुरुवातीला घाबरत होते. कारण सामानाला धक्का लागून तूटण्याची शक्यता जास्त होती. पण आजपर्यंत असे कोणतेही नुकसान झालेले नाही असे दुकान मालकाने म्हटले आहे. आता या दुकानात ग्राहकांपेक्षा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.