छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेत असणारे प्रत्येक पात्र ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना ही मालिका आणि गोकुळ धाम सोसायटी लक्षात आहे. मालिकेतील बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या खऱ्या आयुष्याविषयी आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेत जेठालाल बबिताजीच्या प्रेमात असल्याचे दिसते. मात्र, खऱ्या आयुष्यात मुनमुन दत्ता ही मालिकेत जेठालालचा मुलगा टप्पू अर्थात राज अनादकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. हे दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. राज आणि मुनमुनमध्ये ९ वर्षांचा फरक आहे.

आणखी वाचा : बेडकासारखा आवाज आहे म्हणणाऱ्या ट्रोलरला फरहान अख्तरने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला…

सोशल मीडिया मुनमुनच्या सोशल मीडिया पोस्टवर राजच्या कमेंट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एका वृत्त वाहिनीला सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता…’च्या संपूर्ण टीमला या दोघां विषयी माहित आहे. एवढंच नाही तर त्या दोघांच्या कुटुंबाला देखील या विषयी माहित आहे.

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची संपूर्ण टीम त्या दोघांच्या नात्यावर कधीच विनोद करत नाही. राज हा २४ वर्षाचा आहे आणि मुनमुन दत्ता त्याच्याहून ९ वर्षांनी मोठी आहे. तर मुनमुनने २ महिन्यांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. एवढी सगळी माहिती समोर येत असली, तरी देखील राज आणि मुनमुनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah munmun dutta aka babita ji is in real love with 9 year younger raj anadkat aka tappu dcp