छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. त्याप्रमाणेच मालिकेतील कलाकार हे अतिशय लोकप्रिय आहेत. आता या मालिकेतील एका कालाकाराला बिग बॉसची ऑफर आली असल्याचे समोर आले आहे. पण या कलाकाराने ती ऑफर स्विकारली की नकार दिला? तसेच हा कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला जाणून घेऊया ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कोणत्या कलाकाराला बिग बॉसची ऑफर आली होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सोढी ही भूमिका अभिनेते गुरुचरण सिंह यांनी साकरली होती. पण काही खासगी कारणामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ‘बिग बॉस १५’ आणि ‘बिग बॉस ओटीटी’ची ऑफर आल्याचा खुलासा केला. पण गुरुचरण यांनी दोन्ही ऑफर्सला नकार दिला.

गुरुचरण यांनी नुकतीच ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बिग बॉसच्या ऑफर बद्दल खुलासा केला आहे. ‘माझी निर्मात्यांसोबत फिल्म सीटीमध्ये मिटिंग होणार होती. पण नंतर ती पुढे ढकलण्यात आली. आजपर्यंत ती मिटिंग झालेली नाही याचे कारण केवळ चॅनेललाच माहिती आहे. निर्मात्यांनी मला सांगितले होते की मी बिग बॉसचा हिस्सा व्हावा असे त्यांची इच्छा आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी त्यांना हो म्हटले होते’ असे गुरुचरण म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘आम्ही भेटणार होतो. पण त्यावेळी त्यांना वेळ नव्हता. नंतर भेटू असे म्हणाले. पण मी तेव्हा परत जाणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही. मला नाही माहिती त्यांना मी खरच बिग बॉसचा भाग व्हावा असे वाटत होते की नाही. मला बिग बॉस ओटीटीची ऑफर देखील आली होती. त्यांनी मला क्वारंटाइन होण्यास सांगितले होते आणि मी तयार देखील झालो होतो. मी नंतर मला काहीच बोलणे झाले नाही.’

Story img Loader