‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने संपूर्ण मालिका विश्वाची व्याख्या बदलून टाकली. २००८ साली सुरु झालेली ही मालिका आजतागायत सुरु आहे. नवनवीन कथानक, कलाकारांची फौज त्याचबरोबरीने मनोरंजन या गोष्टींमुळे तारक मेहता ही मालिका प्रेक्षकांच्या पंसंतीस पडली आहे. आज मालिकेचे हजारो भाग प्रदर्शित झाले आहेत. मात्र गेल्या १० वर्षात कलाकारांनी मालिका सोडल्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. नेहा मेहता, गुरुचरण सोधी आणि शैलेश लोढा यांनी मालिका सोडली. शैलेश लोढा हे मालिकेत सूत्रधाराच्या भूमिकेत दिसायचे. त्यांच्या जागी आता सचिन श्रॉफ हा अभिनेता दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकामागून एक कलाकार मालिका सोडत असताना मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी टाईम्स नाऊशी बोलताना ते असं म्हणाले की ‘सर्व जण १३-१४ वर्षांपासून एकत्र काम करत आहेत आणि तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका रात्रंदिवस त्यांच्या विचारात आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोत. जेव्हा कोणता कलाकार मालिका सोडतो तेव्हा मला खूप वाईट वाटते.’ असित कुमार पुढे म्हणाले, ‘आम्ही आमच्या पंधराव्या वर्षात आहोत, आम्ही एकत्र काम करतो, आम्हाला आता सवय झाली आहे कारण आम्ही १२-१४ तास चित्रीकरण करतो आणि जर तुमचा विचार केला तर आम्ही संपूर्ण महिना मालिकेमध्ये घालवतो. या कुटुंबातून जर कोणी एकटा माणूस निघून गेला तर ते दुःखदायक आहे.’

“माझा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी डॉक्टरांनी मला सांगितले होते.. ” हृतिक रोशनने सांगितली ‘ती’ आठवण

असित कुमारपुढे म्हणाले की, ‘प्रत्येकाची स्वतः ची गरज असते. ‘मालिकेला १३-१४ वर्षे झाली असल्याने, लोकांना काहीतरी वेगळे करायचे असेल तेव्हा मी त्यांना थांबवू शकत नाहीत. मी कलाकारांनाही दोष देऊ शकत नाही कारण त्यांच्या गरजा असतील ज्या मी पूर्ण करू शकत नाही, बदल हा जीवनाचा मार्ग आहे, मग आपण काय करू शकतो?’ आपण हे (कास्टिंग चेंज) सकारात्मकतेने घेतले पाहिजे, असा निष्कर्ष असित यांनी काढला. मालिका सोडलेल्या कलाकारांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी गुरुचरण सिंग सोढी यांनी मालिका सोडली आणि त्यांच्या जागी बलविंदर सिंग सूरी आले. तारकच्या पत्नी अंजली मेहताची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताच्या जागी सुनयना फोजदारची निवड करण्यात आली. मालिकेतील लोकप्रिय पात्र दयाबेन उर्फ दिशा वकानीदेखील मालिकेत परतत नाही, मालिकेचे चाहते तिची वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah producer asit modi opens up on actors quitting show says i feel sad spg