छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील जुनी सोनू म्हणजेच निधी भानुशालीचे लाखो चाहते आहेत. निधी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. निधीच्या बॉयफ्रेंडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निधी समुद्रकिनाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला निधी किनाऱ्यावर चालत असल्याचे दिसत आहे. निधी सुर्यास्ताचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी एक मुलगा दिसत असून हा निधीचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. निधीने या मुलासोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे हे रिलेशनशिपमध्ये असणार अशा चर्चा आहेत.
आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का
आणखी वाचा : मिसेस हाथी आणि मिसेस सोढीने विचारले जयाजीं बद्दल खाजगी प्रश्न बिग बी म्हणाले…
निधी गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या रोड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. दरम्यान, या आधी निधी ही ‘तारक मेहता…’ मालिकेत आत्माराम भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका साकारत होती. ती टप्पू सेनेतील सगळ्यात हुशार मेंबर होती. आता ही भूमिका पलक सिधवानी साकारतेय निधी आणि पलक आधी झील मेहता ही भूमिका साकारत होती.