IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माची चर्चा सुरु असताना त्याचा एक जुना फोटोसुद्धा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक छोटा मुलगा दिसतोय. हा छोटा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तिपेंद्र जेठालाल गडा ऊर्फ टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट आहे. मालिकेत लहानपणीच्या टप्पूची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. त्यानंतर त्याच्या जागी राजची एण्ट्री झाली.
या फोटोमध्ये राज भारताची जर्सी घालून आणि चेहऱ्यावर तिरंग्याचा रंग लावून भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजने बरंच वजन कमी केलं असून टप्पूच्या भूमिकेत चपखल बसण्यासाठी योग्य ती मेहनत घेतली आहे. मार्च महिन्यात त्याने ‘तारक मेहता..’ या मालिकेत तीन वर्षे पूर्ण केली आहेत. भव्य गांधीइतकंच त्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळतंय. सोशल मीडियावरही त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : जिम ट्रेनर ते अभिनेता… प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या शरद केळकरचा प्रवास
राजने ‘तारक मेहता..’शिवाय ‘मेरी माँ’, ‘रिश्ता साझेदारी का’, ‘महाभारत’ (२०१३) या मालिकांमध्ये काम केलंय.