‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो प्रेक्षकांमध्ये बराच लोकप्रिय आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसते. सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या या शोचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा शो पाहू शकते. मात्र सोमवारी प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये मात्र शोच्या मेकर्सकडून मोठी चूक झाली आणि आता त्यासाठी त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबाबत मेकर्सनी ही चूक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधाममधील सर्व सदस्य सोसायटी क्लबमध्ये एकत्र जमलेले दिसत आहेत. याठिकाणी जुन्या काळातील गाणी लावून त्यावर चर्चा करत होते. अशात लता मंगेशकर यांचं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं सुरु होतं. त्यानंतर यावर बोलताना मिस्टर भिडे म्हणाले की, हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं आणि त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लता मंगेशकर यांचं हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांच्याही डोळयात पाणी आलं होतं.

आणखी वाचा- Video : टायगर श्रॉफला समोर पाहून तरुणी झाली बेशुद्ध अन्…

आणखी वाचा- यशला KGF करायचा नव्हता हिंदी भाषेत प्रदर्शित पण… वाचा नेमकं काय घडलं

या शोमध्ये लता दीदींच्या गाण्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यांनी गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख चुकीची सांगितली होती. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता शोच्या संपूर्ण टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या या चुकीसाठी माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलं, ‘आम्ही आमचे शुभचिंतक, चाहते आणि प्रेक्षक यांची माफी मागू इच्छितो. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख १९६५ असल्याचं म्हटलं होतं. पण हे गाणं २६ जानेवारी १९६३ मध्ये प्रदर्शित झालं होतं. आम्ही आमची चूक मान्य करतो आणि पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेऊ- तुमचा असित मोदी आणि तारक मेहताची संपूर्ण टीम.’