छोट्या पडद्यावर प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील प्रत्येक कलाकारांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळालीय. यातील ‘बबीताजी’ या जेठालालसोबत सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा चाहती बनली आहे. बबीताजी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असते. अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या संबंधित एक आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आलीय.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमध्ये दिसत नाही. या शोमधून अचानक बबीताजी गायब झाल्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. अभिनेत्री मुनमुन दत्ता ही गेल्या अनेक दिवसांपासून शो च्या शूटिंग सेटवर येत नसल्याचं बोललं जातंय. एक महिन्यापूर्वीच शोमधली सगळी टीम दमणमधलं शूटिंग आटोपून परतलीय. सध्या या शो चं शूटिंग मुंबईत सुरूय. मुंबईत आल्यापासून या शोसाठी अभिनेत्री मुनमुन दत्तासाठीची कोणती स्किप्ट सुद्धा लिहिली जात नसल्याचं बोललं जातंय.
या कारणांमुळे बबीताजीने सोडली मालिका?
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडली होती. तेव्हापासून ती या शोमधून गायब झालेली दिसून आली. अभिनेत्री मुनमुन दत्ताने ही मालिका सोडली असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलीय.
View this post on Instagram
अभिनेत्री मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सोडली असल्याच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलंय. मात्र यावर अद्याप तरी मुनमुन दत्ताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या चर्चांमुळे बबीताजीचे फॅन्स मात्र काहीसे निराश झाले आहेत. या मालिकेत जेठालाल बबीताजीसोबत फ्लर्ट करताना प्रेक्षक खूपच एन्जॉय करत होते. बबीताजी आणि जेठालाल यांची जोडी मालिकेत चांगलीच विनोदी भूमिका साकारत लोकांना हसवत होते.
View this post on Instagram
गेल्या महिन्यात अभिनेत्री मुनमुन दत्ता एका व्हिडिओमुळे वादात अडकली होती. या प्रकरणात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. इतकंच काय तर या प्रकरणामुळे तिच्यावर पोलिस कोठडीत सुद्धा जाण्याची वेळ आली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने तो व्हिडिओ काढून टाकला होता. तसंच तिच्या चुकीबद्दल क्षमा मागितली होती. या प्रकरणामुळे मुनमुन दत्ताला मानसिक त्रास झाला आणि ती पूर्णपणे खचून गेली होती. यामुळेच ती मालिकेची सेटवर शूटसाठी येत नसल्याचं बोललं जातंय.