छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काका ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान मालिकेत दाखवण्यात आलेल्या गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या मालकाने एक व्हिडीओ शेअर करत नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत जेठालालचे गडा इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान दाखवण्यात आले आहे. हे दुकान मुंबईतील खार परिसरात आहे. या दुकानाच्या मालकाचे नाव शेखर गडीयार असे आहे. शेखर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली आहे. या व्हिडीओमध्ये नट्टू काकांच्या फोटोला फुलांचा हार घालून खूर्चीवर ठेवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनेकांनी कमेंट करत नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जेठालालच्या ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ दुकानाचा कोण आहे मालक? जाणून घ्या
‘शेवटच्या दिवसांमध्ये ते स्वत:चे नावही विसरले होते’, नट्टू काकांचा मुलगा झाला भावूक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची कथा दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमधील पोपटलाल पत्रकार आहे, मेहता साहेब हे लेखक आहेत, आत्माराम तुकाराम हे कोचिंग क्लासेस घेतात आणि जेठालाल चंपकलाल यांचे गडा इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. जेठालालच्या दुकानात नट्टू काका, बाघा आणि मदन हे काम करतात. जवळपास मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये जेठालालचे दुकान दाखवण्यात येते.