‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत भिडे गुरुजींची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली हिचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होते. निधीला याआधी इतक्या बोल्ड अंदाजात पाहिलं गेलं नसल्याने नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तर काहींनी चक्क, भिडे सर आपकी बेटी तो हाथ से निकल गई अशा कमेंट्स करत निधीला ट्रोल केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निधी या ट्रोलर्सवर भडकली.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “हे माझं आयुष्य आहे. प्रत्येकजण जसे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात तसंच मीसुद्धा केलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या फोटोंमुळे मी ट्रेण्ड होऊ लागले. सध्या इतर अनेक बोलण्यासारखे विषय आहेत, पण माझ्या बिकिनी फोटोंवर इतकी चर्चा व्हावी म्हणजे हे हास्यास्पदच आहे. देशात शेतकरी आंदोलनसारख्या इतक्या घडामोडी घडत असताना लोकांना माझ्या बिकिनीतील फोटोंवर बोलायला वेळ आहे. मला या गोष्टीचा रागसुद्धा आला आणि हसूसुद्धा आलं. कदाचित लोकांना मला असं बघायची सवय नाही म्हणून त्यांनी इतके कमेंट्स केले असावेत.”
View this post on Instagram
भिडे सरांच्या सोनूचे बिकीनीतले फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात…
निधीने वयाच्या बाराव्या वर्षापासून ‘तारक मेहता..’मध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी तिने मालिका सोडली.