बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिचा आज वाढदिवस. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख सांगितली जाते. तब्बूचे अनेक चित्रपट आजही हिट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसबरोबर चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या तब्बूचे खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरले आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले होते.
तब्बून वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी हम नौजवान या चित्रपटातून करिअरच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘हम नौजवान’ असे तिच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने साकारली होती. त्यानंर मात्र तिने मागे वळून बघितलेच नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि तब्बू हे दोघेही तब्बल १० वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते.
आणखी वाचा : “मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले
नागार्जुन आणि तब्बू यांची ओळख एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. त्यावेळी ते दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशिप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिले असल्याचे म्हटले जाते. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते. पण त्याबरोबर त्याला पत्नीला घटस्फोटही द्यायचा नव्हता. तब्बूला मात्र हे मान्य नव्हते. यानंतर मात्र त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
आणखी वाचा : “महेश मांजरेकर दबंग आहेत त्यांनी…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
तब्बू आणि नागार्जुनच्या नात्याची चर्चा रंगत असताना एकदा एका मुलाखतीत त्याने स्वत: याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केले होते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुनने याबद्दल त्याचे मत व्यक्त केले होते. त्यावेळी त्याला तब्बूबरोबरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “हो, तब्बू माझी फार जुनी आणि चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. मी साधारण २१ किंवा २२ वर्षांचा होतो आणि ती फक्त १६ वर्षांची होती. म्हणजे आमच्या वयात बरेच अंतर होते.”
“आमच्या मैत्रीबद्दल जितकं बोललं जातं तितकं ते कमीच वाटते. माझ्याकडे तिच्याबद्दल लपवण्यासारखे काही नाही. जेव्हा तुम्ही कधी तिचे नाव मला विचारता किंवा सांगता तेव्हा माझा चेहरा उजळतो. आता, मी जेव्हा या अशा गोष्टी ऐकतो किंवा सांगतो, त्यात जर तुम्हाला काही वेगळे मुद्दे काढायचे असतील तर तो तुमचा दृष्टिकोन आहे. माझ्यासाठी ती एक सुंदर व्यक्ती आहे. त्याबरोबरच एक चांगली मैत्रीणही आहे आणि ती नेहमीच असेल”, असे नागार्जुनने म्हटले होते.
दरम्यान तब्बू आता लवकर दृश्यम २ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील अनेक लूकही समोर आले आहेत. याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.