अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप- खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिने स्वत:दिली होती. त्यानंतर तिने मास्टेक्टोमीचे उपचार घेतले असून ती कामावर परतल्याचं तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
ताहिराने ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘काम सुरु..प्रिप्रोडक्शन, हॅपी थँक्सगिविंग. आभारी आहे,’ असं म्हटलं आहे. यासोबत तिने तिचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यातच आयुष्मानने ताहिराची ही पोस्ट रिट्विट करत तिचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आयुष्मान प्रत्येक वेळी ताहिराला पाठिंबा दिला असून यंदाच्या वर्षी तिने ताहिरासाठी चक्क करवाचौथचं व्रतदेखील केलं होतं.
Work starts! #preproduction #HappyThanksgiving #gratitude pic.twitter.com/xhEhHyVd6W
— Tahira Kashyap Khurrana (@tahira_k) November 22, 2018
so proud!! https://t.co/HnPi1PyOzc
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) November 22, 2018
दरम्यान, ताहिराने काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून कॅन्सर झाला असल्याची माहिती दिली. तसेच इन्स्टाग्राम पोस्टमार्फत तिनं खुलेपणानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझ्यासारख्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मी ही पोस्ट लिहिली आहे, असं ताहिरानं म्हटलं आहे.