दूधी हा आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. दूधीचा रस हृदयासाठी उत्तम मानला जातो. दूधीच्या रसाने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यासोबत यात मोठ्या प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम आढळते. मात्र दूधीचा रस हा जितका गुणकारी तितकाच तो नुकसानदायकही ठरु शकतो. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला दूधीच्या ज्यूसमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. त्यामुळे यापुढे दूधीचा ज्यूस घेतेवेळी काळजी घ्या, असे आवाहन ताहिराने चाहत्यांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताहिराने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने दूधीच्या रसामुळे निर्माण होणाऱ्या विषबाधेच्या गंभीर परिणामांबद्दल सांगितले आहे. यावेळी ताहिरा म्हणाली, “मी नेहमी हळद, दूधी आणि आवळ्याच्या रसाचे सेवन करते. मात्र त्या दिवशी मी जो रस प्यायली त्यातील दूधी हा चवीला कडसर होता. तो रस प्यायल्यानंतर मला फार उलट्या झाल्या. माझे ब्लरप्रेशर अचानक वाढले. यानंतर मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर आता मी स्थिर असली तरी हा फार वाईट अनुभव होता.”

यामुळेच ताहिराने तिच्या डॉक्टरांच्या विनंतीवरून, चाहत्यांना आणि तिच्या मित्रांना दुधीचा रस योग्य पद्धतीने कसा प्यावा, हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत ताहिरा कश्यपने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. “कडू दूधीच्या रसाचे फार गंभीर परिणाम होतात. कधीकझी तर यामुळे विषबाधाही होऊ शकते. हे फार प्राणघातक आहे. फक्त आरोग्याच्या नावावर रस पिऊ नका! मी ICU मध्ये असण्यामागचे हेच कारण आहे,” असे तिने या म्हटले आहे.

दरम्यान कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून आयुष्मान-ताहिराकडे पाहिलं जातं. कॉलेजजीवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. मात्र त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tahira kashyap reached icu after drinking bitter gourd juice share video nrp
Show comments