संपूर्ण देशात महाशिवरात्री धुमधडाक्यात साजरी केली जाते. सोशल मीडियावर अनेक लोक महादेवाचा फोटो शेअर करत शुभेच्छा देत असतात. तर अनेकदा महादेवाच्या अवतारातील व्यक्तींचे फोटो व्हायरल होताना दिसतात. त्यापैकी एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. हा फोटो लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूर अली खान आहे.

व्हायरल झालेल्या फोटोत तैमूरने गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणि शॉर्ट्स परिधान केली आहे. यात तैमूर शंकराच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तैमूरच्या माथ्यावर महादेवाप्रमाणेच भस्म आणि त्यावर तिसरा डोळा दिसत आहे. एवढचं नाही तर महादेवाला साजेसं असं रुप धारण करण्यासाठी त्याचे केसही बांधण्यात आले आहेत.

तैमूर आता धाकटा राहिलेला नसून मोठा झाला आहे. त्याच्या घरी त्याच्यासोबत खेळायला त्याचा लहान भाऊ आला आहे. करीनाने काही दिवसांपुर्वी तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने तिच्या बाळासोबत पहिलांदा एक फोटो शेअर केला होता. मात्र, त्या फोटोत करीनाने तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. यामुळे करीना आणि सैफचे चाहते त्यांच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आणि त्याचे नाव काय असेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सैफ अली खान लवकरच ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सैफ, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर सोबत दिसणार आहे. तर ‘आदिपुरूष’ हा देखील त्याचा आगामी चित्रपट आहे. दुसरीकडे करीना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. दुसऱ्या बाळाला जन्म देण्या आधी करीनाने या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले होते.

Story img Loader