बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा लाडका लेक तैमूर हा लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. तैमूरची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. तैमूरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तैमूरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत तैमूर आणि सैफ दिसत आहेत. ते दोघे ही कारमधून उतरल्याचे दिसत आहेत. सैफच्या हातात एक ग्लास असून तो पकडण्यासाठी तैमूर धडपळ करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तैमूरने चक्क सैफवर हात उचलला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव

आणखी वाचा : “जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : “मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

तैमूर आणि सैफचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सैफ त्याला म्हणाला असेल प्रॉपर्टीचा ५ वाटेकरी लवकरच येणार.” तिसरा म्हणाला, “वडिलांसोबत असं कोणी वागतं हे खूप वाईट आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आता पासून वडिलांना मारतो, सैफ बागबान बघ,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तैमूरला ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taimur ali khan gets trolled for raising hands on saif ali khan dcp