सैफ -करिनाचा लेक तैमुर अली खान सध्याच्या घडीला लोकप्रियतेमध्ये प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला मागे टाकत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या नावाची जणू क्रेझच आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे गेल्यावर्षी हुबेहूब त्याच्याप्रमाणेच दिसणारी खेळणी बाजारात आली होती. त्यानंतर आता तैमुर कुकीजदेखील बाजारात दाखल झाले आहेत.
कस्टमाईज कुकीज् तयार करणाऱ्या एका बेकरीने तैमुर कुकीज् बाजारात आणली असून सध्या या कुकीजची जोरदार विक्री सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये या बेकरीतील कुकीज् पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आली.
दरम्यान, गेल्या वर्षी तैमुरप्रमाणे दिसणारी हुबेहूब बाहुली बाजारात आली होती. ही बाहुली पाहून सैफ खुश झाला होता. तर करिना मात्र प्रचंड संतापली होती. माझं बाळ भूतासारखं दिसत नाही अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. परंतु तैमुरच्या या लोकप्रियतेमुळे करिना सैफ आणि आजी शर्मिला टागोर हे सारेच चिंतेत आहेत.या लोकप्रियतेने तैमूरचे बालपण हिरावले जाऊ नये, अशी चिंता त्यांना आहे.