बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. आज १४ एप्रिल रोजी दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र, चर्चा ही करीना आणि सैफचा लाडका तैमूरची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तैमूरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत तैमूर वडील सैफ सोबत रणबीर आणि आलियाच्या लग्नाला जात असल्याचे दिसते. त्याच्या सोबत त्याची आया दिसतं आहे. तैमूर हातात असलेल्या फोनमध्ये बघत चालत होता. त्यानंतर तो फोटोग्राफर्सवर चिडला आणि त्याने त्यांच्यावर हात उचलला. त्याचा हा राग पाहिल्यानंतर सोशल मीडियावर करीना आणि सैफ ट्रोल होतं आहेत.

आणखी वाचा : Ranbir Alia Wedding Photo : आलियाने शेअर केले शाही लग्नातील ‘हे’ खास फोटो

आणखी वाचा : लग्न न करता प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी करीना-सैफला सोशल मीडियावर ट्रोल केले. एक नेटकरी म्हणाला, “आता पासून फोन वापरायला दिला.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तैमूरला शिष्टाचार किंवा समाजात वागण्याची पद्धत शिकवा असा सल्ला दिला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “आतापासून ही परिस्थिती आहे, मग पुढे जाऊन काय करणार?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हात कोणावर उचलला सैफ वर?”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taimur ali khan shows slap to media at ranbir kapoor alia bhatt wedding saif kareena gets brutally trolled dcp