बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच करीनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करीनाने फॅमिली फोटो काढताना येणाऱ्या अडचणींविषयी सांगितले आहे. मात्र, सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष हे करीनाचा लाडका तैमूरने वेधले आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीना, सैफ अली खान, तैमूर आणि जेह दिसत आहेत. या फोटोत सगळ्यांनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत “करीना म्हणाली, फॅमिली फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना…सैफ फोटो काढण्यासाठी smile कर… टिम तुझ्या नाकातलं बोटं बाहेर काढं…जेह बाबा इथे बघ… मी : अरे कोणी फोटो काढा यार…इतकं केल्यानंतर आम्हाला असा फोटो मिळतो…,” असे कॅप्शन करीनाने दिले आहे.
आणखी वाचा : रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे म्हणाले, “Jealous…”
आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video
करीना आणि सैफचा हा फोटो रणबीर आणि आलियाच्या लग्नातील आहे. रणबीर आणि आलिया काल १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात कुटूंबातील काही लोकांनी आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती.