बॉलिवूडमधील सध्याचा सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्टारकीड म्हणजे अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर खान. तैमूरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचे फोटो काढण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी सैफ- करिनाच्या घरा भोवती गिरक्या घालत असतात. त्यांच्या या सततच्या फेऱ्यांमुळे शेजाऱ्यांना त्रास व्हायला लागला आहे. त्या त्रासाला कंटाळून शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
तैमूरचे फोटो काढण्यासाठी अनेक प्रसार माध्यमांचे प्रतिनीधी सैफ आणि करिनाच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणवर उभे असतात. या प्रतिनीधींकडून अनेक वेळा सोसायटीच्या अनेक नियमांचा भंग होतो. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोसायटीत येऊन सर्व प्रतिनिधींना हकलून लावले आहे.
पोलिसात केलेली तक्रार ही खुद्द सैफ अली खानने केली असल्याचे म्हटले जात होते. परंतु एका मुलाखतीमध्ये सैफने ही तक्रार केली नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. पोलीस तक्रार झाल्यापासून सैफच्या घराखाली मीडियाचा घोळका दिसत नसला तरी तैमूरचा पाठलाग करणे त्यांनी अजूनही थांबवलेले नाही.