मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुन्हा मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

आणखी वाचा – ‘Emergency’ Teaser : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना, टीझरमध्ये अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये ‘टकाटक २’मधील कलाकार मंडळीही पाहायला मिळत आहेत. अभिनेता प्रथमेश परब व्यतिरिक्त नव्या कलाकारांची चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे. अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर आदी कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे.

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एक महाविद्यालय दिसत आहे. म्हणजेच महाविद्यालयातील तरुण मुला-मुलींची धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल असं दिसतंय. ‘टकाटक २’ कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. शिवाय ‘टकाटक २’मध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा – Photos : अंकिता-विकीच्या लग्नाला ६ महिने पूर्ण, नवीन घरामध्ये कुटुंबाबरोबर धम्माल सेलिब्रेशन

‘टकाटक’च्या पहिल्या भागामध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले. तसेच या चित्रपटाची बरीच चर्चा रंगताना दिसली. ‘टकाटक’प्रमाणेच ‘टकाटक २’देखील मनोरंजनाच्या माध्यमातून एक सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. म्हणजेच गोव्याचं निसर्ग सौंदर्य आणि धमाल-मस्ती यामध्ये पाहायला मिळेल.

Story img Loader