धमाल कॉमेडी, बोल्ड दृश्य व दुहेरी अर्थांच्या संवादाचा भरणा असलेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. प्रथमेशसोबत रितिका श्रोत्रीचीही भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव ही जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून मराठीतील हे आतापर्यंतचं सर्वांत बोल्ड गाणं असल्याचं म्हटलं जात आहे.

‘ये चंद्राला’ हे गाणं श्रुती राणेनं गायलं असून जय अत्रेंनी ते शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यात अभिजीत आमकर व प्रणाली भालेराव रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. मराठीतील हे बोल्ड गाणं मानलं जात असून सोशल मीडियावर गाण्याची फार चर्चा आहे.

udit narayan old video to kiss alka Yagnik and karishma kapoor
Video : उदित नारायण यांनी अल्का याज्ञिक व करिश्मा कपूर यांनाही भर स्टेजवर केलेलं Kiss; वादग्रस्त व्हिडीओवर गायक काय म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
Bigg Boss 18 Fame Vivian Dsena Share Special post for wife nouran aly
Video: ‘तुम ही हो’ गाणं गात विवियन डिसेनाने पत्नीला दिली फ्लाइंग किस, अभिनेत्याचा पाहा रोमँटिक अंदाज
nana patekar wife neelkanti makes her acting comeback in vicky kaushal chhaava movie
Video : ‘छावा’मध्ये झळकणार नाना पाटेकरांच्या पत्नी! नव्या गाण्यात दिसली पहिली झलक, नीलकांती पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Jasprit Bumrah attends Coldplay concert in Ahmedabad Chris Martin sings personalised song for pacer Video
VIDEO: जसप्रीत बुमराहची Coldplay कॉन्सर्टला हजेरी, ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी गायलं खास गाणं; इंग्लंडच्या फलंदाजांचा केला उल्लेख

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अडल्ट कॉमेडी, हॉट सीन्स, किसिंग सीन्स दाखविण्यात आले आहेत. ट्रेलरमधील बोल्डपणा या गाण्यातही पाहायला मिळतो. पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदी कलाकारही आहेत. येत्या 28 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Story img Loader