बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. आपल्या चित्रपटांसोबतच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनिल कपूर हे लवकरच त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर अनिल कपूर यांचा थार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अनिल कपूर यांनी हर्षवर्धन कपूरबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
अनिल कपूर आणि हर्षवर्धन यांचा ‘थार’ हा चित्रपट ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनिल कपूरने हर्षवर्धनसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
“…अन् मी तुझ्यावर फिदा झाले”, अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्यावेळी ते म्हणाले, “मला हर्षसोबत काम करताना फार छान वाटले. पण मला त्याची एक गोष्ट खटकली ती म्हणजे न विंचरलेले केस. मी एका सीनच्या शूटींगदरम्यान हर्षला म्हणालो की कोणत्या तरी हेअरस्टाइलिस्टला बोलव आणि पहिले तुझे केस नीट कर. त्यावेळी मी प्रोडक्शन हाऊसला त्याच्या केसाबद्दल सांगितले. तर त्यावेळी मला प्रोडक्शन हाऊसने बजेट नाही असे उत्तर दिले. मला प्रोडक्शन हाऊसचे हे उत्तर ऐकून सुरुवातीला फार विचित्र वाटले.”
पण त्यानंतर हर्ष मला म्हणाला की याच लूकमध्ये काम करायला तयार आहे. मला हेअरड्रेसर किंवा मेकअप मॅनची आवश्यकता नाही. पण त्यावेळी मला त्याचे केस अजिबात आवडत नव्हते. त्यावेळी मी काळजीपोटी प्रॉडक्शन हाऊसला सांगितले होते की तुम्हाला हवं तर माझ्याकडून पैसे घ्या, पण निदान माझ्या मुलासाठी म्हणजेच हर्षला शूटिंगसाठी सेटवर एक हेअरस्टाइलिस्ट आणि मेकअप मॅन द्या. पण त्यावर हर्षने मला समजवून सांगितले की, मी हेअर ड्रेसर आणि मेकअपशिवाय शूटींग करु शकतो. असेही अनिल कपूर यांनी म्हटले.
अनिल कपूर यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, तेव्हा सेटवर प्रत्येकासाठी हेअर ड्रेसर आणि मेकअप मेन होता. पण हर्षने हा संपूर्ण चित्रपट मेकअपशिवाय शूट केला आहे. तो त्याचे केसही स्वत: नीट करत असायचा. त्यामुळे या चित्रपटात तुम्हाला हर्षचा वेगळा लूक पाहायला मिळणार आहे.”
“ती ११ लाखांची पैठणी मी देणार नाही…”, आदेश बांदेकरांनी ट्रोलर्सला सुनावले खडे बोल
दरम्यान हर्षवर्धन आणि अनिल कपूरचा हा दुसरा एकत्र चित्रपट असणार आहे. यापूर्वी ते Ak vs Akमध्ये दिसले होते. त्यानंतर आता त्या दोघांचा ‘थार’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि हर्षवर्धन यांच्यासोबत सतीश कौशिक, फातिमा सना शेख आणि अक्षय ओबेरॉय हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज सिंह चौधरी यांनी केले आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.