तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलीवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. तमन्नाने आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावलं आहे. तमन्नाकडे वेगवेगळ्या दागिन्यांचे कलेक्शनमध्ये आहे. यामध्ये डायमंड रिंगपासून हिऱ्यांच्या नेकलेसचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्नाकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा हिरा असलेली अंगठी आहे. पण ही अंगठी तिला एका खास व्यक्तीने भेट दिली असल्याची चर्चा रंगली होती. आता तमन्नाने या चर्चांवर मौन सोडत खरं उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’मधील २० दृश्यांवर कात्री, वाढली निर्मात्यांची चिंता

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…

मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना भाटियाने ही अंगठी स्वतः विकत घेतली नसून एका खास व्यक्तीने तिला ही अंगठी भेट दिली असल्याचे सांगण्यात येते. राम चरणची पत्नी उपासना हिने तमन्नाला ही अंगठी दिली असल्याची चर्चा आहे. असं म्हणतात, ‘सये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटातील तमन्नाच्या अभिनयाने उपासना खूपच प्रभावित झाली होती. त्यानंतर त्यांनी ही अंगठी तमन्नाला भेट दिली.

हेही वाचा- आयुष्मान खुरानाला स्त्री वेषात पाहून अमृता खानविलकर फिदा, म्हणाली, “कोणीतरी…”

आत तमन्नाने या चर्चांवर मौन सोडत उत्तर दिलं आहे. तमन्नाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या हिऱ्याच्या अंगठीसह व्हायरल झालेला फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करण्याबरोबरच अभिनेत्रीने उपासनाकडून एवढी महागडी हिऱ्याची अंगठी मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन केले. व्हायरल फोटो शेअर करत तमन्नाने खरं काय ते सांगितलं आहे. ही खरी अंगठी नसून बॉटल ओपनर असल्याचे तमन्नाने स्पष्ट केलं आहे.

या चित्रपटात तमन्नाशिवाय अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपती, नयनतारा आणि निहारिका यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. राम चरणच्या निर्मितीमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. जो त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. ही अंगठी गिफ्ट केल्यानंतर उपासनाने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्री ही अंगठी परिधान करताना दिसली होती.

Story img Loader